लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: निशुल्क प्रवेशाची घोषणा म्हणजे विद्यार्थ्यांची फसवणूक, विद्यापीठाकडून शुल्काची उघड उकळणी या आशयचे वृत्त लोकवृत्त या पोर्टला प्रकाशीत झाले. सदर वृत्त पूर्णतःचुकीचे आहे. करिता हा खुलासा सादर करीत आहोत.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करीता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एम. ए.,एम. कॉम., एम.एस्सी., एम. बी.ए. यासारख्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातोय. या बाबत निशुल्क प्रवेशाच्या जाहिरातीही प्रकाशित झाल्या.
सदर जाहिरातीत 25 रुपये नाममात्र शुल्काचा स्पष्ट उल्लेख आहे. शासनाने ठरवून दिलेल्या 16 शुल्कांपैकी कुठलेही शुल्क विद्यापीठाकडून आकारले जात नाही.प्रवेश मोफत दिला जातोय.
२५ रूपये रजिस्ट्रेशन फी
विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रवेश प्रकिया सुरु असून एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. अभ्यासक्रमाचे शुल्क शुन्य आहे. परंतु विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर अर्ज करण्याकरीता अडचणी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने नाममात्र प्रवेश नोंदणी शुल्क म्हणून रूपये २५ घेण्याबाबचा निर्णय घेतलेला आहे.. एम.ए., एम. कॉम., एम.एस्सी. च्या ११ अभ्यासकमाकरीता रूपये २५ नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे. एम.बी.ए. अभ्यासक्रमाचे प्रवेश तंत्र शिक्षण विभागाकडून त्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे त्यांचे शुल्क तंत्र शिक्षण विभागाच्या दिशानिर्देशानुसार ठरविण्यात आले आहे.
नामांकन शुल्क
नामांकन शुल्क प्रति विद्यार्थी रूपये २१०/- हे बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे.असे परीक्षा व मुल्यमापन मंडळ विभागाचे दिनांक २३/०७/२०२५ रोजीचे नामांकन परिपत्रक मधील मुद्या कमांक ०२ मध्ये नमूद आहे.
इमिग्रेशन शुल्क
इमिग्रेशन शुल्क व्यावसायिक अभ्यासकमाकरीता रूपये २००/- व अव्यावसायीक अभ्यासकमाकरीता रूपये १००/- हे बाहेरील विद्यापीठ किंवा बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे असे परीक्षा व मुल्यमापन मंडळ विभागाचे दिनाक २३/०७/२०२५ रोजीचे नामांकन परिपत्रक मधील मुद्दा क्रमांक 8 मध्ये नमुद आहे.
इमिग्रेशन शुल्क हे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू होत नाही. फक्त बाहेरील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना लागू होते.
त्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेचे हनन होईल. अशा प्रकारचे कुठलेही वृत्त आपण आपल्या माध्यमातून प्रकाशित करू नये.
विद्यार्थी हा विद्यापीठाचा कणा आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच दालन खुलवावं तसेच आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये. त्यांनाही शिक्षण घेता यावं.
या उद्दात हेतूने प्रेरित होऊन विद्यापीठाने हा निर्णय घेतलाय. यासाठी 2022 पासून विद्यापीठाने निशुल्क शिक्षणाची योजना सुरू केलेली आहे.