लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यात देसाईगंज येथे एकमेव रेल्वे स्थानक असून चांदा फोर्ट ते गोंदिया या रेल्वे लाईन दरम्यान देसाईगंज रेल्वे स्थानक आहे. परंतु सदर रेल्वेस्थानकावर कोणत्याही सोयी-सुविधा नव्हत्या. त्याकरिता केंद्र शासनाने अमृत भारत योजनेअंतर्गत १८ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानिक रेल्वेस्थानकावर विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे रेल्वेस्थानकाचे संपूर्ण रूपच बदलले आहे. रेल्वेस्थानकाबाहेरील अडगळीच्या जागेला देखील सुस्वरूप प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२३ रोजी संपूर्ण भारतात आभासी पद्धतीने अमृत भारत रेल्वे विकासकामाचे भूमिपूजन केले. त्यानंतर डिसेंबर २०२३ पासून प्रत्यक्षात विकासकामाला सुरुवात झाली.
सदरची कामे एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावयाची होती. या कामाकरिता चार विविध कंपन्यांना कामाचे टेन्डर दिले असून त्यांचे कडून विकासकाम सुरू असून डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येण्यास अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. अजूनही १० टक्के काम शिल्लक आहे. मात्र रेल्वेस्थानकाच्या होत असलेल्या या विकासकामांमुळे स्थानकाचे संपूर्ण रूपाच बदलले आहे. स्थानकावरील पहिला दिवसरात्र फडकत राहणारा राष्ट्रीय ध्वज शहरात लागला आहे. स्थानकावरील ब्रह्मपुरी मार्गावर मुख्य गेट तयार करण्यात आले आहे. दुचाकी ठेवण्याकरिता दर्शनी भागात कमानीदार शेड तयार करण्यात आले आहे.. तिकीट घराच्या परिसरात बसण्यासाठी आसन तसेच देखणे छत लावण्यात आले आहे. रेल्जावे लाईन ओलांडण्ण्यायासाठी भव्य उड्डाणपूल बांधण्यात आले आहे. उर्वरित विकासाची कामे सुरु आहे.
हे ही वाचा,