…. ‘या’ नदीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह 

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

वर्धा, दि. ११ फेब्रुवारी : हिंगणघाट तालुक्यातील मानोरा शिवारातील पोथरानदी परिसरात एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.. मागिल ४ दिवसांपुर्वी नागरी (गौळ) या शिवारात वाघ मुक्त संचार करीत असताना परिसरातील नागरिकांना आढळला होता. परंतु आता तालुक्यातील पोथरा नदी परीसरात वाघ मृतावस्थेत आढळल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.

यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की हा वाघ वर्धा जिल्ह्यातील नसून नदीच्या पाण्यात वाहत आलेला असल्याचे त्यांनी सांगितले तसेच घटनास्थळ हे चंद्रपूर जिल्हा किंवा वर्धा जिल्ह्यात येत आहे का याची सुद्धा सखोल चौकशी केल्यानंतरच त्या वाघाचा अंतिम संस्कार केला जाईल असेही वनविभागाचे अधिकारी श्री पवार यांनी सांगितले… वाघाचा मृत्यु कशामुळे झाला हे वन विभागाकडुन अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नाही…