धक्कादायक! विहीरीत आढळला युवकाचा मृतदेह!! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. ०६ डिसेंबर : आलापल्ली गावातील बजरंग चौकानजिक असलेल्या विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रविण शंकर पेद्दिवार (३८) अस या युवकाचे नाव असून हा एस. टी. महामंडळाच्या अहेरी डेपो मध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

मिळालेल्या माहितनुसार, प्रविण हा ०४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता घरी काहीच न सांगताच घरुन बाहेर निघाला तेव्हापासून घरी परतलाच नव्हता. प्रविण घरी न परतल्याने त्याच्या परिवारातील सदस्यांनी व त्याचे मित्रांनी सर्वत्र ठिकाणी शोधाशोध केली असता प्रविण चा शोध लागला नाही. परंतु आज ६ डिसेंबर रोजी मार्कंडेय मंदिर परिसरातील  विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी बघितले असता त्याचा मृतदेहच आढळून आला. 

या घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस घटना स्थळावर दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय अहेरी येथे पाठविण्यात आला.

प्रविण पेद्दीवार यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. या घटनेने त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र ठिकाणी हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

सदर घटनेचा तपास पोलिस विभाग करीत आहे.

हे देखील वाचा : 

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिमुकल्यांनी वृक्षारोपण करत राबवले अनोखे अभियान

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती

 

allapallicrime