पनवेल येथे हॉस्पिटल, दवाखाने, केमिस्ट सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आयुक्तांनी दिले आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. १७ एप्रिल: रायगड जिल्ह्याच्या पनवेल  तालुक्यातील पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील वाढती दररोज ची कोरोना रुग्ण संख्या पाहता पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज दिनांक १७ एप्रिल व उद्या दिनांक १८ एप्रिल रोजी मेडिकल, हॉस्पिटल, दवाखाने सोडून सर्व दुकाने, ऑफिस बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत.

त्याची अंमलबजावणी करत पनवेल येथील व्यापाऱ्यांनी दोन दिवस आपापली दुकाने पूर्णतः बंद ठेवणार असून  पनवेल आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले आहे.

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी करण्यासाठी पोलिस प्रशासन ठिकठिकाणी नाका बंदी केली आहे. कित्येक ठिकाणी रस्त्यावर तुरळक वाहने धावताना दिसत असून अनेक रस्ते मोकळे दिसत आहेत. योग्य कारण असल्यास व आवश्यक तो पास दाखविल्यास पोलीस त्या त्या वाहन धारकांना सोडत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरू नये असे आवाहन पोलिसांनी केले असल्याने प्रवी संख्या कमी असल्याने रिक्षा चालक कोणतेही प्रवासी मिळत नसल्यामुळे नाराज झाले आहेत.

Sudhakar Deshmukh