रविवारी होणार प्रवाशांचे हाल…रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 24, सप्टेंबर :-  उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २५ सप्टेंबर २०२२ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगांव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्य रेल्वे -कुठे- माटुंगा- ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावरकधी- सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत परिणाम – या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचेल. तर कल्याण येथून अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावरकधी – ११. १० ते ४.१० वाजेपर्यंतपरिणाम -ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.पश्चिम रेल्वे -कुठे – सांताक्रुज ते गोरेगांव अप- डाऊन धिम्या मार्गावरकधी – सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यतपरिणाम -या ब्लॉकदरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुज ते गोरेगांव स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सर्व धीम्या उपनगरीय गाड्यांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबे दिले जातील तर जलद मार्गावर फलाट उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही दिशेच्या उपनगरीय गाड्या राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. तर या ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

हे देखील वाचा :-

all three line blockindian railwaymumbaimumbai lifelinerailway route block