बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू चेंगराचेंगरीत नसून दम्याच्या विकाराने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे, 23 ऑक्टोबर :- काल सर्व माध्यमातून पुणे येथून बाहेरगावी जाणाऱ्या गाडीत चेंगराचेंगरीत प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी झळकली होती, (लोकस्पर्श नव्हे ). परंतु आज चौकशीअंती त्या प्रवाशाचा मृत्यू दम्याच्या विकाराने झाल्याचे निदर्शनास आले आहे.

दिवाळीनिमित्त काल राज्याभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती. याच गर्दीमुळे पुण्यातील रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती.

मात्र, साजन बलदेवन याचा मृत्यू चेंगराचेंगरीत मृत्यु झाला नसून, दम्याच्या आजारामुळे सदर प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन हा काल पुणे दानापूर एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बिहारला जाणार होता.

मात्र, बिहारला जात असताना त्याची प्रकृती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच अतिशय खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन सोबत असलेल्या त्याच्या इतर सहकारी मित्रांनी देखील त्याला दम्याचा आजार असल्यास पोलीस पुणे रेल्वे पोलीस विभागाला कळवल आहे.

हे पण वाचा :-

मराठी सिनेमा ‘हर हर महादेव’ बाॅलिवूड वर पडणार भारी

बिबटाचा हल्ला, शेतकरी महिला व लहान बाळ गंभीर जखमी

going outof commutersThe deathto stampedewas not due