धक्कादायक प्रकार: कोव्हिड सेंटरमधील कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे डॉक्टरने केली शरीरसुखाची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील एका कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टराने महिला रुग्णावर केला बलात्काराचा प्रयत्न

औरंगाबाद, ४ मार्च: औरंगाबाद जिल्ह्यातील एका कोव्हिड सेंटरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना सेंटरमध्ये डॉक्टराने रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद शहरातील पदमपुरा याठिकाणी असणाऱ्या कोरोना उपचार केंद्रावर घडली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्‍टरला बेदम मारहाण केली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहे. दरम्यान या डॉक्टरला तिथून हटवण्यात आले आहे. असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित डॉक्टरने तिचा फोन नंबर मिळवला होता. तो रोज तिला फोन करून त्रास द्यायचा असाही आरोप या महिलेने केला आहे. बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिन मध्ये बोलावलं. मंगळवारी रात्री 2 च्या सुमारासा या डॉक्टरने त्या कोव्हिड रुग्ण असणाऱ्या महिलेस शरीरसुखाची मागणी केली. मीडिया अहवालानुसार त्याच्यावर असा आरोप ठेवण्यात आला आहे की, या डॉक्टरने त्या कोव्हिड रुग्ण महिलेला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने आरडाओरड केल्यानंतर हा सगळा राडा घडला आहे.

दरम्यान या पीडित महिलेने बदनामीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र महापालिका आयुक्तांना तिने घडला प्रकार सांगितला, त्यानंतर त्या डॉक्टरची सेवा संपवण्यात आली आहे. मात्र कोरोना केंद्रावरही आता महिला सुरक्षित नाही ही बाब फारच धक्कादायक आहे.

बुधवारी घडलेला हा प्रकार समजल्यानंतर तातडीने आस्तिककुमार पांडेय यांनी प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशीअंती डॉक्टरची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Aurangabad