वनौषधीची लागवड व प्रशिक्षण देऊन समाजाची आर्थिक उन्नती साधता येईल – अतुल लिमये यांचे प्रतिपादन

रोल संस्थेचा विशेष पुढाकाराने चिंचगुंडी अहेरी येथील रोल संस्थेच्या वनौषधी प्रकल्प व प्रशिक्षण केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १५ डिसेंबर: गडचिरोली जिल्ह्यातील जनजाती  हा येथील सुसंस्कृत समाज आहे. आधुनिक परिभाषेत हा समाज बोलत नाही ह्या समाजाला आधुनिक भाषेत बोलायला शिकवण काळाची गरज आहे. त्यासाठी ह्या समाजाची आर्थिक उन्नती होणे महत्वाचे आहे. त्यासाठी रोल सारख्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना वनौषधीची लागवड, प्रशिक्षण देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधता येईल. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचारक अतुल लिमये यांनी आज चिंचगुंडी अहेरी  येथील रोल संस्थेच्या वनौषधी प्रकल्प व प्रशिक्षण केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकार्पण प्रसंगी केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार,जिल्हा सहसंघचालक गजानन राऊलवार, रोल चे सचिव डॉ.सुरेश डंबोळे यांची होती. भगवान धनवंतरी व भारतमातेला माल्यार्पण, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत शेवग्याच्या रोपटे देऊन करण्यात आले.

पुढे बोलतांना लिमये म्हणाले, देशाला परमवैभवाला नेण्याचे साध्य करायचे असेल तर समस्यांचे समाधान झाल्याशिवाय शक्य नाही. गडचिरोली जिल्हा हा विविध समस्यांनी ग्रस्त आहे. ह्या समस्या सोडविण्यासाठी रोल सारख्या संस्थेची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यासाठी समाजात आर्थिक उन्नती, संगोपन, सुरक्षा व  विचारप्रक्रिया रुजविणे गरजेचे आहे. जनजाती ह्या समाजात वनौषधी चे उपचारात फार महत्व आहे ह्या भागात वनौषधी विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. एकूणच जगात व भारतात वनौषधीचा व्यवसाय फार मोठा आहे. मात्र येथील जनजाती ह्याकडे व्यवसाय म्हणून कधीच बघत नाहीत.  इथली वनौषधी विकुन पैसे मिळतील असा त्यांचा दृष्टिकोन नाही. त्यांच्या गरजा कमी आहेत, ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक स्वावलंबन करता येईल.दुदैवाने वनौषधी ची माहिती पिढयां न पिढ्या कमी होत चालली आहे. त्यामुळे नव्या पिढीला ही माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच हा ठेवा जतन केला जाऊ शकतो. त्यासाठी रानभाज्या महोत्सव प्रदर्शनी च्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान माहिती पोहचवता येईल.

वनौषधी ची माहिती समाजात सर्वपर्यत पोहोचवावी त्यांचे संगोपन, वनौषधीची लागवड जनजाती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करावी. त्याच संकलन कराव आणि चांगली विक्रीची सोबत प्रक्रिया करण्याची व्यवस्था करावी अशी पूर्ण एक व्यवस्था एक साखळी विकसित करू शकलो तर जनजाती समाजापर्यंत आपण आर्थिक लाभ पोहचवू शकतो. त्यासाठी रोलच्या माध्यमातून अशा व्यवस्था विकसित कराव्या लागतील. त्यासाठी गावा-गावात वनौषधी लागवड करणारी मंडळी विकसित करावी लागेल. अशी लागवड कोण करते ते शोधावे लागेल. प्रत्यक्षात इथला पुजारी समाज आहे त्याच्याकडून त्यांच्या पायाशी बसून आपल्याला नवीन गोष्टी शिकाव्या लागेल.

वनौषधी कुठल्या कुठल्या आहेत त्याचा उपयोग कुठे होतो तर हे जे आपण शिकू शकलो  तर काही गोष्टी त्यांना पण शिकवाव्या लागेल. आधुनिक परिभाषेत बोलायचं कस ? त्याचे उपयोग काय काय आहे. त्यातले गुणधर्म काय काय आहे हे आधुनिक परिभाषेत आपण शिकू शकलो त्याची मार्केटिंग वाल्यू (विक्री मुल्य) जास्त राहील. गावागावात आर्थिक संपन्नता पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल त्यासाठी अश्या गतीविधी आपल्याकडे सुरु झाले.

वन-धन केंद्र वनोपजाचे संकलन करून त्याच्यावर प्रर्क्रिया करणे त्याच्यावर विक्रीची व्यवस्था करन त्याच एक वन-धन केंद्र  असू शकते. पण अशा अनेक व्यवस्था आपल्याला उभ्या करावा लागतील संपर्क संवाद संघटन या सूत्राच उपयोग करून वनौषधी क्षेत्रात काम कराव लागेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोल चे सचिव डॉ. सुरेश डंबोळे त्यांनी रोल या संस्थेच्या कामाबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. वैयक्तिक गीत  वसुंदरा परिवार हमारा याचे गायन स्वाती रोहणकर यांनी केले.  कार्यक्रमाचे संचालन प्रा. मीनाक्षी वेरुळकर यांनी तर आभार एड. प्रीती डंबोळे  यांनी केले.