लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची संरक्षक भिंतिलगत असलेले अतिक्रमण हटविल्याने दुकान मालकावर उपासमारीचे संकट कोसळणार आहे.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची संरक्षक भिंत उंच करायची असल्याने नगरपालिकेची सूचना मिळताच अतिक्रमन धारक दुकानदारांनी मंगळवारी स्वतःहून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे . याअगोदर सुद्धा रुग्णालयाच्या एका बाजूच्या गेटचे सुशोभीकरण करण्यात आले त्यावेळीही अतिक्रमण हटविण्यात आले होते. आता दुसऱ्या बाजूच्या गेटचे बांधकाम होण्याची शक्यता आहे. तसेच रुग्णालयाची संरक्षक भिंत उंच बांधली जाणार आहे. त्याकरिता नगरपालिकेने संबंदित दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याची केवळ सूचना दिली तसेच नगरपालिकेच्या पथकाने सोबत जेसीबी आणली होती. तरीही दुकानदारांनी स्वत:हून दुकान हटविण्यास सुरुवात केली. त्यामुळे नगर पालिकेला कारवाई करण्याची गरजच पडली नाही.
सदरचे अतिक्रमणामध्ये दुकान थाटून काही कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता मात्र, दुकान बंद झाल्याने अतिक्रमण हटविण्यात आल्याने त्यांचे कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे.