जांभळी येथे वनविभागाने बिबट्याला केले जेरबंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. ३ डिसेंबर: आरमोरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र धानोरा अंतर्गत येत असलेल्या जांभळी येथील सुरेश सोमा धुर्वे यांचे राहते घरी दबा धरून बसलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करून धानोरा त्यानंतर गडचिरोलीला हलविन्यात आले.

2 डिसेंबर 2020 ला सायंकाळच्या सुमारास जांभळी येथील सुरेश सोमा धुर्वे यांच्या घरी शेळीची शिकार करण्यासाठी घरात बिबट्या घुसला. मात्र तो रात्रभर तिथेच दबा धरून बसल्याने गावकऱ्यांची तहानभूक विसरले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला तिथेच बंद करून ठेवले याची माहिती वनविभागाला देण्यात आली वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करीत आज सकाळी 10:30 वाजता बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

यावेळी उपवनसंरक्षक डॉक्टर कुमार स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, कुमारी चेतना मस्के वनपरिक्षेत्र अधिकारी धानोरा, बळवंत येवले क्षेत्रसहाय्यक रांगी, गडचिरोली येथील गस्ती पथकातील कर्मचारी, रेस्क्यू टीम ब्रह्मपुरी आणि नागभिड,  ढोरे वनरक्षक, सचिन थोरात, जाबोर वनरक्षक उपस्थित होते. यासह गावकरी आणि बिबट्याला बघण्यासाठी हजारो लोकांची गर्दी येथे जमली होती.

संपूर्ण कार्यवाही यशस्वी करण्याकरिता वनपाल अरूप कन्नमवार, वनरक्षक राजू कोडाप, धम्मराव दुर्गमवार, सर्पमित्र सर्वश्री अजय कुक्कुडकर, मकसूद सय्यद, कृष्णा हुलके, ईश्वर सयाम, मुकेश लांजेवार, कुणाल निमगडे यांनी सहकार्य केले.