गावाच्या परिसरात घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागला यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नाशिक, दि. १८ एप्रिल: नाशिकच्या गंगापूर रोडवर नरसिंह नगर परिसरात  घुसलेल्या  बिबट्याला  जेरबंद करण्यात  वनविभाग ला यश आले आहे.  दिंडोरी च्या भाजप च्या खा. डॉ भारती पवार यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात सकाळी मॉर्निंग वोक करतांना काही नागरिकांना हा बिबट्या दिसला, त्यानंतर ही माहिती पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त होताच त्यांनी बिबट्याचा शोध सुरू केला.

बिबट्या खूपच चपळ असल्याने वन कर्मचाऱ्यांना त्याला पकडणे अवघड झाले होते. बिबट्याला बंदुकीतून गुंगीचे इंजेक्शन मारण्यात वन अधिकारी यशस्वी झाले. त्यानंतर एका इमारतीच्या डक्ट मधून जाळीच्या साह्याने त्याला जेरबंद करण्यात आले.

यात वनाधिकारी विवेक भदाणे यांना बिबट्याने पंजा मारल्याने ते जखमी झाले.  नागरिकांना वारंवार सूचना  देऊन  देखील करोना  काळात नागरिकांनी मोबाईल वर बिबट्याचे फोटो आणि चित्रीकरण करण्यासाठी गर्दी केली यात सोशल डिस्टनसिग चा पुरता फज्जा उडाला आहे.