कोरोना लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टंसिन्गचा फज्जा

– बल्लारपूर येथील वस्ती विभागातीलकोरोना लसीकरण केंद्रावर भोंगळ  कारभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बल्लारपूर, दि. २८ एप्रिल: बल्लारपूर येथील वस्ती विभागातील कोरोना लसीकरण केंद्रावर भोंगळ  कारभार चालू असुन, लस घेणाऱ्यांना दाटीवाटीनी बसविले जात आहे. त्यात एखादा कोरोना रूग्ण आढळला तर तो इतरांना बाधित केल्याशिवाय राहणार नाही.

येथे कार्यरत असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचे व्यवस्थापन बरोबर नसल्याने हे सर्व त्यांच्या डोळ्यासमोर चालत असुन ते मात्र मुंग गिळून गप्प बसून आहे. उच्च प्रशासनानी याची दखल घेऊन व्यवस्थापन ची ए, बी, सी, डी शिकवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे.


Ballarpur