कार्यालयीन वेळेत खेळ रंगला क्रिकेटचा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. आलापल्ली विभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ०५ डिसेंबर: महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीचे आलापल्ली येथे विभागीय कार्यालय असून याच कार्यालयात ६ नोव्हेंबर २०२० रोजी ४ ते ५ च्या दरम्यान अधिकारी नसल्याने कार्यालयातील कर्मचारी चक्क कार्यालयाच्या समोर क्रिकेटचा खेळ मांडला होता . मात्र एका जागरूक एडवोकेटमुळे सदर झालेला प्रकार उघडकीस आल्याने जिल्हासह महाराष्ट्रात ख़ळबळ उडाली आहे.

अहेरी येथील ॲड. संघरत्न कुंभारे यांच्या घरगुती वीज बिलाच्या तक्रारी संदर्भात विभागीय कार्यालय आलापली येथे आले असता चक्क कार्यालयाच्या मुख्य प्रवेश दारासमोर क्रिकेट खेळताना कर्मचारी आढळून आले. मात्र दुर्लक्ष करीत कार्यालयाच्या आत गेले त्यावेळी कार्यालयात कोणीच नव्हते आणि जे कर्मचारी होते ते सर्व कार्यालयासमोर क्रिकेट खेळण्यात व्यस्त होते. त्यावेळी सदर एडवोकेट यांनी कामासंदर्भात विचारले असता त्यातील एका कर्मचाऱ्याने “वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही. आणि अधिकारी उपस्थित नसले तर काम होत नाही. त्यामुळे कुठलेच काम आता होणार नाही “असे स्पष्ट उदगार काढले. त्यावेळी एडवोकेट यांचा संताप वाढला आणि आपल्या मोबाईल ने कर्मचारी क्रिकेट खेळत असलेला कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ बनविला. त्यावेळी कर्मचारी क्रिकेट बंद करुन आत गेले असले तरी काम होणार नाही हे सुद्धा त्यांचे लक्षात आले .
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात महावितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाचा विस्तार बराच विस्तारलेला असून अहेरी,एटापल्ली ,चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड अशा अतिदुर्गम नक्षलग्रस्त सहा तालुक्याचा समावेश आहे . वीज वितरण कंपनीचे शासकीय कामासाठी आदिवासी बांधवाना नक्षलग्रस्त भागातून कधी पायी तर खाजगी वाहनाने यावे लागते आणि काम करावे लागते. मात्र या ठिकाणी आल्यावर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सामान्य भोळ्याभाबड्या नागरिकांचे न ऐकता विज ग्राहकांनाच आपलेच ऎकवून मोकळे करतात त्यामुळे नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. कार्यालया संदर्भात वारंवार तक्रार होत असली तरी लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकारांच्ये दुर्लक्ष केल्याने येथील अधिकार्यांनच्या मनमानी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे.

जगामध्ये कोरोना महामारीमुळे लाॅॅक़डाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे उद्योग बंद झाले. अनेकांंचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले. तब्बल आठ महिन्यापासून नागरिक घरातच स्वतःला कोंबून घेतले आहे. आपल्या जवळील पैसे खर्च झाल्याने सध्या उदरनिर्वाह करणे ही सुद्धा कठीण झाले आहे. सामान्य नागरिकांकडे कामकाज नसल्याने आर्थिक चनचन निर्माण झाली आहे . आणि त्यातही विजबिल जास्तीचे येत असल्याने अडचण निर्माण झाली असून घरचीही आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. कोरोना महामारीत विजबिलात सवलत किव्हा माफ होईल अशी अपेक्षा असतांंना राज्य शासनाने कोरोना संसर्गामुळे राज्याच्या तिजोरीत भार पडल्याने वीज वितरण कंपनीचे बिल माफ किंवा सवलत देता येणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना जास्त आलेले बिलही भरावे लागत आहे. विजबिल नाही भरले तर विद्युत कर्मचारी विद्युत कापणार ही सुद्धा नागरिकांच्या मनात भीती आहेच. राज्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना मार्फत वीज बिल माफ करण्यासाठी आंदोलन, मोर्चे, वीज बिलांची जाळपोळ करण्यात आली तरीही विज बिल माफ करण्यात आले नाही किंव्हा सवलत मिळाली नसली तरी विज कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत असल्याने सामान्य नागरिकांचे देणे घेणे काहीच नाही असेच स्पष्ट होतेय.
महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालय आलापल्ली येथे एडवोकेट कुंभारे यांनी दिलेल्या माहिती संदर्भात कार्यकारी अभियंता यांच्याशी संवाद केला असता कार्यकारी अभियंता सुरुवातीला असे झालेच नाही! कार्यालयाच्या ठिकाणी कोणतेही कर्मचारी क्रिकेट खेळत नाही. आपण आरोप करत आहात आपल्याकडे काय पुरावा आहे असे विचारले? त्यावेळी सदर व्हिडिओ दाखवतांंना हे सर्व खोटे आहे. काही आरोप करता आपल्याला काय बातमी करायची आहे ती करा. मी कुठलीच प्रतिक्रिया माहिती देणार नाही म्हणत उडवाउडवीचे उत्तर देत माझी वरिष्ठ कार्यालयात तक्रार करा ! किंवा ऊर्जा मंत्र्यांना माहिती द्या! असे उद्धट वार्तालाप केला आहे जर प्रतिनिधीशी अरेरावी करीत असतील तर सामान्य जनतेचे खरच प्रश्न सुटतील का? हाच प्रश्न अनुतीर्ण आहे. खरच आतातरी लोकप्रतीनिधी, अधिकारी दखल घेण्याची गरज असल्याची नागरिकांंत जोरदार चर्चा होत आहे.

ajit pawarAnil DeshmukhDadaji BhuseDevendra FadnavinDhananjay MundeDr. Nitin RautK C PadviPankaja Mundesudhir mungantiwarUddhav Thakarey