शेकडो लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांनी केला गौरव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. २० जुलै  : मुंबईत मे महिन्यात आलेल्या तौते वादळात बॉम्बे हाय येथे पी-३६५ तराफ्याला भीषण अपघात झाला असताना शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि.२०) राजभवन येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले.

राज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या शौर्याचे कौतुक करीत नौदलाच्या सर्व जवानांना शाबासकी केली. आयएनएस तलवारचे कमान अधिकारी कॅप्टन पार्थ भट्ट जहाजावर कर्तव्य बजावत असल्याने राज्यपालांना भेटण्यास येऊ शकले नाही.

हे देखील वाचा  :

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच स्टोन आर्ट कलाकृती

कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांची मोर्चे बांधणीला सुरुवात