मुख्याध्यापकाची शाळेला दांडी ? शाळेतील व्यवस्था वाऱ्यावर..

शिक्षणाधिकारी देणार लक्ष...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील एक शिक्षकी मुख्याध्यापक शासनाच्या विविध कामामुळे शाळा वाऱ्यावर असते. मात्र अहेरी तालुक्यापासून अगदी बारा किमी अंतरावर असलेल्या राजे धर्मराव हायस्कूल वेलगुर शाळा मुख्याध्यापकाच्या सुट्टीमुळे वाऱ्यावर आहे. मुख्याध्यापक सुट्टीवर गेले पण कोणाकडेच प्रभार देऊन गेले नाही.अर्थातच संस्थेद्वारे सुद्धा सुट्टी नसल्याचे दिसते.

नवेगाव मधील एक पालक बोनाफाईड सर्टिफिकेट घेण्यासाठी आले असताना नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी वापस यावे लागले असे सांगितले. कारण मुख्याध्यापक भुते यांनी कोणाकडेच सुट्टीवर जाताना प्रभार देवुन गेले नसल्याचे स्पष्ट कळले नाही.याशिवाय कार्यालयातील कारकूनही रजेवर आहेत.

दोन तीन नवेगावच्या विद्यार्थ्यांना शाळेबद्दल विचारपूस केली असता विद्यार्थ्यांनी शाळेतील व्यवस्थित बद्दलच बोलून दाखवले . शालेय पोषण आहारात सदर मुख्याध्यापक आल्यापासून एकदा ही भाजीपाला पोषण आहारात मुलांना दिला नाही. शासन विद्यार्थ्याला घडवण्यासाठी सतत आहार मिळवण्यासाठी लाखोचा खर्च करीत असताना मुख्याध्यापकच दुर्लक्ष करत असेल तर मुलांचं शिक्षणासह आरोग्यावर काय परिणाम याकडेही मुख्याध्यापकांनी अक्ष्यंम दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळेच विद्यार्थ्यांना मध्य सुट्टी दरम्यान सकस आहार मिळत नसल्याचे पालकांनी सांगितले अशा मुख्याध्यापकांना अभय कोणाचे ? हा प्रश्न गंभीर निर्माण झाले असून शाळा व्यवस्थापनाने त्याची गंभीर दखल घ्यावी असेही पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.