16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर होणारी सुनावणी पुढे ढकलली

आता 4 आठवड्यानंतर होणार सुनावणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 01 नोव्हेंबर :-  16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांना निर्देश दिले आहेत की दोन्ही बाजूच्या वकिलांनी समोरा समोर बसून कोण कोणत्या मुद्द्यांवर बोलणार आहे ते ठरवावे, दोन-दोन वकिलांनी खटल्याचा गोषवारा तयार करावा, सोबत पुरावे सादर करावेत, पुराव्यांची यादी सादर करावी. आपली बाजू लेखी मांडावी असे न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांना सांगितले आहे. त्यासाठी न्यायालयानेच ४ आठवड्यानी २९ नोव्हेंबर रोजी ची तारीख दिली आहे.   त्यामुळे ही सुनावणी आता चार आठवड्यानंतर होणार आहे. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

या सुनावणीत खटल्या संदर्भात कालमर्यादा निश्चित आता चार आठवड्यानंतर केली जाउ शकते. एकनाथ शिंदे यांच्यावतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्यावतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे वकील बाजू मांडणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावरील निर्णय पुढे गेला आहे. खरी शिवसेना कोणाची? याचा निकाल निवडणूक आयोग करेल असे स्पष्ट करत बंडखोर शिंदे गटाला दिलासा दिला होता. परंतु आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्ता संघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत न्यायालयाने कुठलेही निर्देश दिले नव्हते. अशात आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागते होते.

हे देखील वाचा :-

16 MLAshearingpostponed