पिंपळाच्या पानात महापुरुष, नेते, देवी-देवता यांचा प्रतिमा साकार

कोरोनाच्या काळात अर्थार्जनाचा मिळाला नवा मार्ग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

वाशिम, दि. १८ डिसेंबर: माणसाच्या मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर तो काहीपण करून यशाचे शिखर गाठू शकतो. असेच एक उदाहरण वाशिम जिल्ह्यातील वाकद तालुका रिसोड येथील शंतनू देशमुख यांनी करून दाखविले आहे.  

कोरोना काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले आणि अनेकांच्या व्यवसायावर गंडांतर आलं. अशाच तरुणा पैकी एक तरुण म्हणजे वाशिम जिल्ह्यातील वाकद तालुका रिसोड येथील शंतनू देशमुख, तो ग्रामीण भागातील शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नृत्य शिकवणे अथवा सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शन करणे असे काम करून आपली उपजीविका करीत असे पण लॉकडाऊनने त्याच्या या व्यवसायावर गंडांतर आलं. यावर त्याने नवा मार्ग शोधला आपल्या अंगी असलेली दुसरी कला त्याने समाज माध्यमाद्वारे लोकांनपुढे सादर केली, ती म्हणजे पिंपळाचे पान कोरून त्यावर देवी-देवता, महापुरुष, नेते चित्रपट क्षेत्रातील नट-नट्या यांच्या प्रतिमा साकार करणे, त्याच्या या छंदाला समाज माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळू लागला, यु ट्यूबचे व्ह्यूवर वाढू लागले तसेच पिंपळाच्या पानावरील या प्रतिमांना ग्राहकांकडून मागणी वाढू लागली आणि त्याला अर्थार्जनाचा नवा मार्ग मिळाला.