लोकस्पर्श न्युज नेटवर्क
सिंधुदुर्ग 23 फेब्रुवारी :- कोकणचा अर्थकारण आंबा पिकावर अवलंबून असतं मात्र हेच आंबा पिक अधिकच्या उष्णतेमुळे अडचणीत आलय.फळांचा राजा जगप्रसिद्ध हापूस आंब्याला वाढत्या उष्णतेचा फटका बसल्याने बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळून पडत आहेत. यामुळे कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे.
यावर्षी थंडीचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने आंबा बागेला फळधारणा झालीच नाही केवळ समुद्राकडील पट्ट्यात काही अंशी आंबा पिक आले तर उर्वरित भागात केवळ काही भागात आंबा पिकाला फुलोरा येत असतानाच उष्णतेच्या फटक्यात आंबा पीक सापडले आहे.रात्री कमी होणारे तापमान आणि दिवसा अचानक वाढणारे तापमान याच्या तफावतीमुळे हा परिणाम आंब्यावर होत आहे.
हापूस आंब्याच्या दक्षिण बाजूच्या सूर्यप्रकाशाकडील आंबा बागा पूर्णतः अडचणीत आले आहेत विशेषता सागरी पट्ट्यातील बागांना अधिकच्या उष्णतेचा प्रभाव होत असल्याने झाडावर झालेले हे आंबे जळून जात आहेत त्यामुळे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोकणच्या हापूस उत्पादक शेतकऱ्यांच् मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अधिक उष्णता पुढील काही दिवसात राहणार असल्याने आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे
विशेष म्हणजे आंबा पिकाला विमा कवचाचा फायदा मिळतो मात्र हा फायदा १५ मार्च पासून दिला जातो प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून डिसेंबर महिन्यात विम्याचे हप्ते भरून घेतले जातात मात्र जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये पिकाच्या होणाऱ्या नुकसानीला कोणताही शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही अशाही भावना शेतकरी वर्ग व्यक्त करत असून विमाचा निकषात बदल करावे अशी मागणी जोर धरत आहे.
हे पण वाचा :-