तीन आरोपी सह भेकर व चौसिंगाचे मांस व कातडे जप्त

सातारा येथे भेकर व चैसिंगाची शिकार, वन्यप्राण्यांचे कातडे, मांस व अन्य साहित्य जब्त, आसाम रायफल मिलिटरी मधील रायफलमॅन युवराज निमन सह दोन जणांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सातारा, 15 नोव्हेंबर :- माची पेठ येथील श्री वास्तु अपार्टमेंट मधुन भेकर व चौसिंगाची शिकार केल्याप्रकरणी आसाम रायफल मिलिटरी मधील रायफलमॅन युवराज निमन सह दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून दोन बंदूका, एक एअर गण व एक सिंगल बोअर बंदूक व जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचे चाकू, कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मटव व कातडे सह भेकर व चौसिंगा यांचे मुंडके जप्त करण्यात आले. या प्रकरणी युवराज निमन सह नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर असा तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, भेकर व चौसिंगाची शिकार केल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे समेत वनपाल, वनरक्ष्क व पंच हे सर्व मिळून माची पेठ येथे असलेल्या श्री वास्तु अपार्टमेंट मध्ये A4 सदनिका मध्ये राहत असलेल्या युवराज निमन यांच्या घरावर छापा मारला. यावेळी त्याच्या घरातुन भेकर व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राणींचे मुंडके व भेकराचे ताजे मटण व पायाचे खुर मिळून आले. यावेळी युवराज निमनची अधिक चौकशी केली असता, त्याने ही शिकार ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर व विठ्ठल किसन बेडेकर यांच्यासोबत मिळून केली असल्याचे सांगितले.

नारायण बेडेकर यांच्या कडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने भेकर ची शिकार केली व भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याचे मटणाचे वाटे केले. भेकराचे मूंडके व थोडे मटण युवराज निमन याला दिले व कातडे सोलून ओढ्यात लपविले व उरलेले मटण विठ्ठल बेडेकर व नारायण बेडेकर यांनी वाटून घेतले. नारायण यांनी आपल्याकडील मटण स्वत:च्या घरात एका पिशवीत घालून घरामागील खोलीत शेणीच्या खाली लपवून ठेवले होते. हे मटण तो सातारा मध्ये कोण्या बड्या हस्तीला देणार असल्याचे सांगितले. या तीनही आरोपींना वनविभागाने सातारा व ठोसेघर येथून अटक करत दोन बंदूका, एक एअर गण व एक सिंगल बोअर बंदूक व जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचे चाकू, कोयला व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मटण व कातडे पंचासमोर जप्त करण्यात आले.

पुढील चौकशी सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले हे करीत आहेत. उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व वनपाल दीपक गायकवाड, खुशाल पावरा, व वनरक्षक विक्रम निकम, राज मोसलगी, अशोक मलप, मारुती माने, साधना राठोड, अश्विनी नरळे, पंच, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, सुहास पवार, चालक सुरेश गबाले, दिनेश नेहेरकर, पवन शिरतोडे या सर्वांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला.

हे देखील वाचा :-

and ChaisingaBhekarhunting insatara