थंडीचा मौसम सुरू होताच नांदेडमध्ये गोदावरी नदीवर पक्ष्यांची संख्या वाढलीय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नांदेड: पहाटेच्या वेळेस पक्ष निरीक्षकांनी नांदेडमध्ये गोदाकाठी हे निरीक्षण नोंदवलय. नांदेडमध्ये पद्मविभूषण स्वर्गीय डॉक्टर सलीम अली आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसानिमित्त पक्षी सप्ताह आयोजन करण्यात आलाय. पक्षीप्रेमी विजय होकर्णे यांच्या वतीने या पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यात जिल्हाधिकारी डॉ विपिन यांच्यासह अनेक पक्षी प्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवत आज गोदाकाठी दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण केले. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

Dr. Salim AliMaruti Chitampalli