सामाजिक कार्याबद्दल माँ विश्र्वभारती सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला गौरव….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली 17 ऑगस्ट :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आलापल्ली येथील ग्रामपंचायत सभागृहात सामाजिक कार्यात विशेष योगदानाबद्दल माँ विश्वभारती सेवा संस्था आलापल्ली यांचा पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका माँ विश्वभारती सेवा संघटना नेहमीच करत असते. मागील तीन वर्षापासून कोरोना महामारी असताना गाव खेड्यात जाऊन कोरोना जनजागृती करून गरजू लोकांना अन्नधान्य पुरविण्यात आले. त्यांच्या संस्थेची अविरत रुग्णसेवी सेवा उपलब्ध करून लोकांना सेवा पुरवते अनेक ठिकाणी वृक्षारोपण करणे, प्रदूषणाबद्दल जनजागृती करणे हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पूर परिस्थितीमध्ये माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आला. समाजकार्यात या भागात सिंहाचा वाटा असतो.

ग्रामपंचायत येथे झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अहेरी चे पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे विशेष अतिथी म्हणून आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल टोलिया, सरपंच शंकर मेश्राम, ग्रामसेवक म्हस्के, उपसरपंच विनोद अकणपल्लीवार ,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश गद्दमवार आदी मान्यवरांची उपस्थिती होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळत आणि पूर परिस्थितीत सेवा कार्य केल्याबद्दल चंद्रकिशोर पांडे, अमोल कोलपाकवार ,मिलिंद खोंड, गंगाधर रंगुवार, ईमरान खान यांना शाल व श्रीफळ देऊन ग्रामपंचयतीतर्फे सत्कार करण्यात आला.
हे देखील वाचा :-

ब्रह्मपुरीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी मृत्युमुखी तर दुसरा गंभीर जखमी !

 

 

allapalimaa vishavbharthi seva