नदीच्या पात्रात पडलेल्या कुटुंबाला वाचवणाऱ्याचाच नदीत बुडून मृत्यू

महाबळेश्वर मधील रेस्क्यू टीम च्या पथकाने पाण्यातून बाहेर काढला युवकांचा मृतदेह.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, ८ जून :  बारामती आणि फलटण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कऱ्हा नदीच्या पात्रात रविवारी सायंकाळी एका युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कऱ्हा नदीच्या बंधाऱ्यावरून रविवारी सायंकाळी बारामतीवरून निघालेल्या कुटुंबातील पती,पत्नी आणि लहान मुलगी मोटारसायकल वरून फलटण तालुक्यातील कांबळेश्वरकडे जात असतांना गाडीसह पाण्यात पडले.  त्यानंतर तिथे असलेल्या तीन तरुणांनी पडलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी लगेच पाण्यात उड्या घेतल्या आणि पाण्यात पडलेल्या तीन जणांना वाचवण्यात त्यांना यश आले.

मात्र वाचवायला गेलेल्या तीन जणांपैकी एकाजण नदीच्या पात्रात बुडून मृत्यू पावला. शुभम संतोष भिसे असे या मृताचे नांव आहे.

घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच रविवारी सायंकाळी फलटण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तो अयशस्वी ठरला. अखेर फलटण पोलिसांना महाबळेश्वर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करावे लागले. या टीमने आज बुडालेल्या युवकाचा मृतदेह पाण्यातून शोधून बाहेर काढलाय. मात्र मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे बारामती फलटण तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा : 

देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!

दिलासादायक ! नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी

IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये विविध पदांच्या एकूण १०६७६ जागांसाठी मेगाभरती

 

Baramatilead story