लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर 23, डिसेंबर :- आमदार जयंत पाटील यांना निलंबन, कर्नाटक सीमावाद विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत,असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. त्याचसोबत विरोधकांकडून पायऱ्यांवर प्रतिसभागृह करण्यात आले आहे.
दिशा सालिअन प्रकरणावर चर्चा सुरू असताना विधानसभेत काल गोंधळ झाला. गोंधळात सत्ताधारी पक्षातील आमदार व्हेलमध्ये जमा झाले. तेव्हा जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले असा आरोप करण्यात येतोय. निर्लज्ज शब्द असंसदीय शब्द असल्याने या शब्दावरून त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. ३२ वर्षांचा अनुभव असलेल्या आमदाराला निलंबित करण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. निलंबन प्रकरणावरून विरोधी पक्षाने काल सभात्याग केला. त्यानुसार, आजही विरोधक सभात्याग करतील का असा प्रश्न विचारला जात आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी सकाळी १० वाजता राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत सभात्याग करायचा की सभागृहात जायचं याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.
हे देखील वाचा :-