कोलाड येथील हाॅटेल अतिथी चे मालक यास माणगाव कोर्टाचा दणका?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड 09, डिसेंबर :-  कल्याण येथील अल्पवयीन मुलीला कामाचे आमिष दाखवून कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मैजे वरसगाव ता,रोहा, जि, रायगड, येथील हॉटेल अतिथी रेस्टारंट व लॉजिग येथे सदर हॉटेलचे मालक दिगंबर गणपत फोटफोटे, याने दि, 21 फेब्रुवारी 2022 ते 26 फेब्रुवारी हॉटेल अतिथी पहिला मंजला रुम नंबर 102, मध्ये अत्याचार केला, संबंधित हॉटेल मालक दिगंबर गणपत फोटफोडे, याच्यावर पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल होऊन दिनाक, 7 डिसेबर 2022 रोजी माणगाव न्यायालय यानी, माणगाव विशेष न्यायालय व सत्र न्यायाधिश हर्षल भालेराव, यानी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीती नंतर आरोपीस दोषी ठरवून दिनाक, 7-12-2022 रोजी 20 वर्ष सक्तमजूरी व रूपये 2,65,000, दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सदर खटल्यामध्ये सहा-सरकारी वकील योगेश तेडूलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले, वरील घटेनेची फिर्याद  कोलाड पोलीसानी घेतली व भा,द,वि,सं,कलम 376,(एन),376(3),506,सह पोक्सो कलम 4, 6, 8अन्यवे गुन्हा दाखल केला, या गुन्ह्याचा तपास पी, एस तायडे, सहा,पोलीस निरीक्षक कोलाड पोलीस ठाणे यानी केला व आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले, सदर गुन्ह्यात पिडीत मुलीची साक्ष व वैधकिय पुरावा महत्वाचा ठरला आहे.

हे देखील वाचा :-