लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली वन विभागाच्या सेमाना परिसरात वनउद्यान असून लगतच प्रसिद्ध हनुमान मंदिर असल्याने पर्यटकांसोबत भाविकाची गर्दी दिसून येते. मात्र वन विभागाच्या दुर्लक्षतेमुळे उद्यानाकडे येणाऱ्या पर्यटकांनमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे..
गडचिरोली : गडचिरोली शहरापासून अगदी तीन किमी अंतरावर प्रसिद्ध सेमाना देवस्थान परिसर असून या ठिकाणी भली मोठी हनुमानाची मूर्ती आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत तर दुसरीकडे निसर्गरम्य भक्तीमय वातावरणाने नागरिक मंत्रमुग्ध होतात. सेमाना मंदिर परिसरात रोजच भक्तिभावाने नागरिक ये-जा करून मोठ्या श्रद्धेने पूजाअर्चा करतात . त्यानंतर लगत असलेल्या वनउद्यानात विरंगुडा म्हणून फिरत असतात. या परिसरात युवापासून तर वृद्धापर्यंत सहभाग घेतात. हीच गोष्ट हेरून तत्कालीन मुख्य वन संरक्षक टी एस के रेड्डी यांनी वन विभागाच्या मोकळ्या जागेचा सदुपयोग करून वन उद्यानाची निर्मिती २०११-१२ वर्षात करून रोजगार निर्मितीसह पर्यटनाला चालना देण्यासाठी अंदाजित ५० लक्ष खर्च करून उद्यानांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर सेमाना परिसरात देवस्थानासोबत पर्यटनालाही चालना मिळाल्याने नागरिकांचा कल वन उद्यानात वाढत गेला. मात्र काही वर्षातच वन विभागाने वन उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती कडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने वन उद्यानाची दैनावस्था केवळ निर्मितीच्या काही वर्षातच सेमाना वन उद्यानाची “वाट” लागल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांत हिरमोड पाहायला मिळत आहे.
सेमाना देवस्थान मंदिर प्रसिद्ध असल्याने नागरिकांची असते रेलचेल.
सेमाना परिसरात प्रसिद्ध देवस्थान असून या ठिकाणी मोठ्या भक्ती भावाने नागरिक जात असतात. सकाळ,दुपार,सायंकाळ नागरिकांची रेलचेल दिसून येते. कित्येक परिवार श्रद्धेने भोजनदानाचा कार्यक्रम करतात तर काही परिवार फक्त भक्तीमय वातावरणात भोजनाचा आस्वाद घेतात. बाहेर गावून येणारे भक्तगण सेमाना मंदिर परिसरात देवाकडे साकडे घालून देवस्थानात पूजाअर्चा करतात. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात देवपूजा सामग्री उपलब्ध असल्याने मोठी सोय पाहायला मिळते आहे. तर मंदिरालगत हिरवाईने नटलेल्या परिसर, तसेच वन उद्यान असल्याने आपसूकच पावले समोर जात होते . कारणही तसेच होते. पर्यटकांना उद्यानात येतात मन मोहून टाकत होते.. मात्र विकसित असलेलं स्थळ आता पूर्णपणे दुर्लक्षित झाले असून त्या ठिकाणी असलेले साहित्य पूर्णतः खराब, पाहायला मिळत असून विशेष सोयीसुविधीकडे दुर्लक्ष गडचिरोली वन विभाग केल्याचे स्पष्ट होते आहे.
वन उद्यान निर्मिती होताच वन संयुक्त समितीकडे सोपवला उद्यानाचा पदभार.
गडचिरोली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या देखरेखित वन संयुक्त समिती वाकडी यांच्याकडे उद्यानाचा कार्यभार सोपवून रोजगार निर्मिती करण्यात आली होती.काही काळ सुव्यवस्थित होता.वन संयुक्त समितीमध्ये काम करणाऱ्यांना रोजगारही उपलब्ध झाला. आजही महिन्याकाठी लाख रुपये जमा होत असल्याचे कामगार सांगत असतात. तरीही वन उद्यानाकडे उपलब्ध निधी होत असतानाही पूर्णता दुर्लक्ष पाहायला मिळते आहे. वनविभागाकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज ही स्थिती पाहायला मिळाली नसती असे व्यवस्थापन समितीचे कर्मचारी दबक्या आवाजात बोलून दाखविले . आज च्या स्थितीत वन उद्यान पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने बकाल अवस्थेत पाहायला मिळत आहे. वन विभागाने लाखोंचा खर्च करून पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध वन्य प्राण्याचे पुतळे उभारण्यासह बालकांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य लावण्यात आले. बागेत विविध प्रकारची आकर्षक झाडेही लावण्यात आली. याशिवाय नागरिकांना उद्यानात समोर बसण्यासाठी विशेष आसनाची व्यवस्था ही करण्यात आली. वनविभागाच्या या उपक्रमाने सुरुवातीला मोठे कौतुक पाहायला मिळत होते. मात्र आता उद्यानाच्या बकाल अवस्थेमुळे पर्यटकांमध्ये वन विभागाच्या कार्यप्रणाली विषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वन उद्यानासाठी घेतलेले साहित्य झाले खराब दुरुस्त होईना..
सेमाना उद्यानात जे सामान खरेदी करण्यात आले होते ते खराब झाले असून या उद्यानात गवत वाढले आहे. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. उद्यानातील कित्येक घेतलेल्या साहित्यांची तुटपुट झाले आहेत. एकंदरीत आजच्या स्थितीत या उद्यानाची बकाल अवस्था झाली आहे. आजही सेमाना देवस्थान व उद्यानाला भेट देण्यासाठी पर्यटक येत आहेत. मात्र बकाल अवस्था बघून उद्यानात येणाऱ्या नागरिकात वन विभागाप्रती नाराजीचा सूर उमटून दिसून येत आहे.
२०२२ रोजी रुजू झाल्यापासून उद्यान मागे होतं त्या स्थितीमध्ये होते. २३-२४ चालू वर्षात “गडचिरोली वनपरिक्षेत्रांतर्गत जवळपास तीस लाखाहून अधिक काम मंजूर झाले असून संरक्षण भिंत तसेच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. लवकरच पर्यटकांना चालना मिळण्यासाठी निधीची मागणी केली जाईल.पुन्हा वनउद्यान चांगले बनवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करणार आहे.”
अरविंद पेंदाम
वन परिक्षेत्र अधिकारी गडचिरोली,