आमदार हरविल्याच्या पोस्टने माजली जिल्ह्यात एकच खळबळ

  • आमदार हरवल्याची पोलिसात तक्रार.
  • फेसबुक, whataap आणि इतर सोशल मीडियावर पोस्ट केली व्हायरल.
  • सामाजिक कार्यकर्त्याने घेतला वर्ध्याच्या आमदारांचा शोध, शोधूनही सापडले नाही आमदार, अखेर पोलिसांत हरवल्याची केली तक्रार दाखल.
  • आमदार साहेबांना पोलिसांनी शोधून जनतेपुढे आणावे तक्रारीत केले नमूद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. २३ एप्रिल:  घरातील आप्तस्वकीय कुणी हरवला तर त्याचा शोध घेतला जातो, नाहीच सापडला तर मग पोलिसात धाव घेतली जाते. असाच प्रकार वर्ध्यात राजकीय नेत्यांच्या बाबतीत घडला आहे, वर्धा मतदार संघाचे आ. डॉ. पंकज भोयर हरविले असल्याची पोस्ट समाजमाध्यमावर झडकली आहे, एवढ्यावरच शोध थांबला नाही तर गेल्या दीड वर्षापासून आमदार दिसले नसल्याने सामाजिक कार्यकर्त्याने आमदार हरविले असल्याची तक्रारच पोलिसात केली आहे. पोलीस अधीक्षकांना देखील तक्रार दिल्या गेली आहे. कोरोना काळात जनतेला गरज असताना आमदार दिसले नाही, त्यामुळे आता त्यांना शोधण्याचे आवाहन जनतेसोबतच पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे.

कोरोनामुळे वर्धा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली आहे, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जनतेला निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधिकडून अपेक्षा वाढल्या आहे, वर्धेकरांनी स्वतःची काळजी घेतली असताना अद्याप दीड वर्षात लोकांना आमदारांचे दर्शन झाले नाही. मोबाईल देखील बंद आहे, कार्यालयात नाहीत, घरी नाहीत, मग आमदार गेले कुठे? ते हरवले काय? असाच प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी व्यक्त केलाय, तशी तक्रार देखील वर्धा पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.

Dr. Pankaj Bhoyar