लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जमिनीचे भाव मागील काही वर्षांत प्रचंड मोठया प्रमाणात वाढ झालेले आहेत.
कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोक्याची व रस्त्याच्या बाजूची जागा असणे आवश्यक आहे. गडचिरोली शहरापासून चारही मुख्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या जागेला अतिशय किंमत आली आहे. व्यावसायिक कारणासाठी सदर शेती खरेदी केली जात आहे. सुमारे ५० लाख रुपये ते १ कोटी रुपये एकर याप्रमाणे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.
दरवर्षी जवळपास १० ते १५ टक्के शेतीचे दर वाढत आहेत. भविष्यात यापेक्षाही अधिक किंमत वाढणार असा विश्वास असल्याने भविष्याचा वेध घेऊन जागा खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे एखादा शेतकरी जमीन विकण्यास तयार झाल्यास घेणाऱ्यांची झुंबड वाढून दर प्रती एकर ५० लाख रुपयांवर पोहोचले असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा,