महिलांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती : भदंत डॉ. चंद्रकीर्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १४ मे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे जिल्हा कार्यालय गडचिरोली च्या वतीने महिला सक्षमीकरण या विषयावर झूम अँप च्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कोविड काळात जमाबंदी असल्याने एकत्र येऊन कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने राज्यभरात बार्टी मार्फत विविध विषयावर ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेणे सुरू आहे.

झूम अँप वर झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ.चंद्रकिर्ती व मा सिद्धेश्वर बेले तालुका व्यवस्थापक उमेद अभियान कुरखेडा उपस्थित होते.दोन्ही मार्गदर्शन यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी सांगितले की जर महिलांना सक्षम व्हायचे असेल तर त्यांनी शिक्षणासोबत व्यवसाय करण्यावर भर दिला पाहीजे.

लघु उद्योग ,गृह उद्योग तसेच बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करून आपला आपल्या परिवाराचा व समाजातील महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास करतील, आजच्या या तंत्रज्ञान युगात सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्याने महिलांनी सुद्धा आपला व्ययसाय हा ऑनलाईन पद्धतीने केल्यास जास्त फायदा करून घेता येईल.त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्या व्यवसायाची जाहिरात सुद्धा करावी व वस्तू सुद्धा लोकांना उपलब्ध करून द्यावा.यामुळे ते स्वतः सोबत इतरांच्या व देशाचा GDP वाढवण्यात त्यांना थोड्या प्रमाणात हातभार लागेल.

सदर ऑनलाईन कार्यक्रम समतादूत प्रकल्प बार्टी कार्यलय गडचिरोली मार्फत घेण्यात आला कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून जिल्हा प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर उपस्थित होते तसेच कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सिद्धेश्वर बेले व डॉ.भदंत चंद्रकिर्ती उपस्थित होते कार्यक्रम चे प्रस्ताविक मनिष गणवीर यांनी केले तर आभार समतादूत वंदना धोंगडे यांनी केले कार्यक्रमात समतादूत व नागरिक उपस्थित होते.