शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी पहिलीत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे घरोघरी जाऊन केले स्वागत

नागेपल्ली येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षकवृंदानी पहिलीत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शालेय पाठ्यपुस्तके देऊन केले स्वागत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : नागेपल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे सोमवारी घरी जाऊन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षकवृंदानी पुष्पगुच्छ व शालेय पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार आज २८ जून पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात करण्यात आली असली तरी कोरोनाच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे अद्यापही बंद आहे.

त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे घरोघरी जाऊन शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी स्वागत करावे असे निर्देश दिले आहे.

त्यानुसार सत्र २०२१-२०२२ या  शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नागेपल्ली येथील विद्यार्थ्याचे इयत्ता पहिली मध्ये दाखल विद्यार्थाचे घरोघरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि. प. प्राथ. शाळा नागेपल्ली येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा अनिषा शरीफ शेख, ग्राम पंचायत सदस्य/साधन व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष राहुल जगन्नाथ सिडाम, साधन व्यवस्थापन समिती सदस्या कांतालक्ष्मी गुरनुले, मुख्याध्यापक निशिकांत निमसरकार, शिक्षक एस. व्ही. दासरवार, निलिमा राहुलगडे, सरिता शिंदे यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

या महिन्यात सुरु होऊ शकतात महाविद्यालये – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

भल्या पहाटेच ‘इथल्या’ मार्केटला लागली भीषण आग, एवढ्या दुकानाची झाली राखरांगोळी

प्राध्यापकांच्या 3064 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

 

lead storynagepalli school