मूर्ती येथे नलफडी केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मूर्ती येथे नलफडी केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. उद्घाटन सरपंच मंगलाताई गेडाम यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रसिकाताई शेरकी होत्या.

केंद्र प्रमुख नारायण तेल्कापल्लीवार यांनी शिक्षणातील नव्या संकल्पना, प्रशिक्षण, शाळा तपासणी, पालकसभा, गणवेश देयके आणि क्रीडा दिन याबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या काळात नलफडी केंद्र दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवावे अशी प्रेरणादायी भूमिका त्यांनी मांडली. परिषदेत बालसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थिनी वंशिका बावणे व स्वरा वडस्कर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

शिक्षक रामरतन चापले व संदीप कोंडेकर यांनी दत्तात्रय वारे यांच्या कार्याची माहिती दिली. विरेन खोब्रागडे व मनीष मंगरूळकर यांनी इंग्रजी कविता व ब्रिटीश कौन्सिल राईम्स सादर करून उत्साह निर्माण केला.

गटशिक्षणाधिकारी मंगलाताई तोडे यांनी शिक्षणातील समस्या व त्यावरील उपाय प्रभावीपणे मांडले. नंतर विषयवार कार्यशाळा घेऊन मराठी, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास तसेच शिष्यवृत्ती, नवोदय व PAT परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रगीताने परिषदेचा समारोप झाला.

Comments (0)
Add Comment