खवले मांजराची तस्करी वनाधिकाऱ्याच्या धास्तीने रोखली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २४ डिसेंबर : आलापल्ली येथील विर बाबुराव चौकात दुर्मीळ असलेले खवले मांजर आढळून आले असून वनाधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेऊन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

 

आलापल्लीच्या जंगलातून वन्यजीवाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्याअनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढविण्यात आली. अशातच आलापल्ली येथील गजबजलेल्या चौकात एक खवले मांजर आढळून आले.लगेच वनाधिकाऱ्यांनी ते पकडून पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेतली आणि त्यास नैसर्गिक अधिवासात सोडले. खवले मांजर आढळलेल्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांनी सांगितले.

गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, उपविभागीय वनाधिकारी नीतेश देवगडे याच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक प्रकाश राजुरकर, ऋषी तावाडे, वनरक्षक देवानंद कचलामी, अनिल पवार, तुषार मडावी, सचिन जाभुळे, महेंद्र इलीचपुरवार, कैलास मातने, गणेश मलगाम, लक्ष्मी नान्हे, जम्मो पुडो, रूपेश तरेवार, वनमजूर बंडू आत्राम, बंडू रामगिरवार, स्वप्नील गंजीवार, नरेंद्र कोटरंगे आदींनी ही कारवाई केली..

हे देखील वाचा: 

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 28 डिसेंबर रोजी

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.

 

Allapalli Rage Forestgadchiroli forestIndian Pangolin