पेसा कायद्याची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी माध्यमांचा योग्य वापर करण्यावर वक्त्यांचा सूर

गोंडवाना विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 23 जून – तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्च ला भेट दिली. त्यांच्या संकल्पनेतून सर्च शोधग्राम आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात ‘स्पार्क’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. समाजासाठी आपल्याला काय करता येईल. यासाठी एक सर्वे व्यसनाधीनतेवर करण्यात आला. व्यसनाधीनता दूर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या संधीचे त्यांनी सोने करावे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांनी यांनी गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज येथे एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी केले.

अधिष्ठाता मानव विज्ञान डॉ. चंद्रमौली,संचालक नवसंशोधन ,नवोपक्रम व साहचर्य डॉ. मनीष उत्तरवार ,मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले ,सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे यांची उपस्थिती होती.सदर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेज चे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वाले यांनी तर आभार सहसंचालक मुक्तीपथ संतोष सावरकर यांनी मानले.यावेळी स्पार्क अभ्यासक्रमाच्या तेरा विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला आणि अभ्यासक्रमा विषयी समाधान व्यक्त केले.

पेसा कायदा म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या वनव्यवस्थापनाला चालना देण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक पुस्तिका होय.या कायद्याच्या तरतुदीमध्ये मादक द्रव्य समितीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे .या समितीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामसभेमध्ये या पद्धतीची समिती जर निर्माण झाली तर प्रत्येक ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये व्यसनमुक्तीचा आग्रह धरून एक चळवळ निर्माण होऊ शकते त्यामुळे पैसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करताना मादक द्रव्य समिती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे . स्पार्क या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये ग्रामविकासात व्यसनाविरुद्ध सामाजिक कार्यक्रम स्पार्क या अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी व पेसा कायद्याचे अनेक पूर्वग्रह आदिवासी आणि गैर आदिवासी या समुदायांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याला वाचा फोडावी व्यसनमुक्तीचे कार्य करताना प्रशासकीय यंत्रणेसोबत समन्वय प्रस्थापित करण्याचे कार्य सुद्धा करायला हवे असे मार्गदर्शन मॉडेल डिग्री कॉलेज व शोध ग्राम सर्च संस्थेच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘पेसा कायदा व मादक द्रव्य समितीतून दारूबंदी तसेच पेसा कायद्याची ग्रामसभेमध्ये उपयुक्तता ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना सृष्टी संस्थेचे संयोजक केशव गुरनुले बोलत होते .

यानंतर लोकसत्ता चे पत्रकार सुमित पाकलवार ‘पेसा कायदा आणि बातम्या’ या विषयावर बोलताना म्हणाले, जनजागृती चे उत्तम माध्यम म्हणजे वृत्तपत्र. शेवटच्या टोकावर वसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वर्तमानपत्राच्या माध्यमातून मिळालेली बातमी जी वाचताना प्रत्यक्षदर्शी होण्याचा अनुभव घेता येतो. त्यामुळे पैसा कायद्याच्या अंतर्गत मादक द्रव्य समितीची प्रभावी अमलबजावणी करताना नवीन उदयास आलेली मीडिया टेक्नॉलॉजी आणि बातम्यांचा सांगड घालून मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार्यता मिळेल. असे ते म्हणाले.या एक दिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला . या कार्यशाळेच्या दोन्ही सत्राचे संचालन डॉ.संदीप लांजेवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॉडेल कॉलेज च्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-