राज्य सरकार बिल्डरांना ५ हजार कोटींची मदत करते पण सामान्य माणसाला नाही – खा. नवनीत राणा यांचा सरकारवर हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. १३ एप्रिल: राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या हालचालीला वेग आला आहे. लॉकडाऊनला नेहमी विरोध करणाऱ्या अमरावतीच्या खा. नवनीत राणा यांनी या निमित्ताने पुन्हा राज्य सरकारवर टीका करत हल्लाबोल केला आहे.

बिल्डरांना ५ कोटीची मदत सरकार करू शकते मग सर्वसामान्य माणसाला का नाही? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. लॉकडाऊन लावण्यापूर्वी सरकारने सर्वसामान्य, शेतकरी व कष्टकरी यांचा विचार करायला पाहिजे तर सर्वसामान्य माणसाला लॉकडाऊन पूर्वी मदत करणे आवश्यक असून विज बिलात सवलत द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तर सर्वसामान्य माणसाचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणीही नवनीत राणा यांनी यावेळी केली आहे.

Navneet Rana