तीन वर्षांच्या सई हत्तीणीच्या पिल्याचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात उडाली खळबळ.

कमलापूर येथील शासकीय हत्तीकॅम्प मधील घटना

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली:३ ऑगस्ट,

कमलापूर येथील शासकीय  हत्ती कॅम्पमध्ये आज  मंगळवारी  पहाटे तीन वर्षाच्या सई नावाच्या हत्तीणीच्या पिल्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील वन विभागाच्या अंतर्गत येणारे  हत्ती कॅम्प राज्यात नावाजलेले आहे या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात.

 

मागील वर्षी २९ जून ला ‘आदित्य’ नावाच्या चार वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर  वन्यजीवप्रेमिनीं या हत्तीच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र, वनविभागाने थातूरमातूर चौकशी करून येथील अधिकार्‍यांची पाठराखण केल्याचे दिसून येत आहे.त्याप्रकाराची  शाई वाळते न वाळतेच पुन्हा एकदा हत्तीणीच्या पिल्याचा आज पहाटे मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ११ जून २०२० रोजी आदित्य नावाचा हत्ती चिखलात अडकला होता. त्याच्यावर वनविभागाने उपचार सुरू केले होते. मात्र २९ जून २०२० ला आदित्य नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. मात्र, वनविभागाने थातूरमातूर चौकशी करून येथील अधिकार्‍यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.

या घटनेमुळे वन विभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सई या तीन वर्षीय हत्तीणीचा पिल्ल्याचा  मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले  नसून  या मृत्यूचे गूढ कायम आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या कमलापूर येथील वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमध्ये एकूण दहा हत्तींचा समावेश होता. मात्र, मागच्या वर्षी २९ जून ला ‘आदित्य’ नावाच्या चार वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी एकूण ९ हत्ती उरले होते. आज पुन्हा ‘सई’ नावाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा वनविभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली असून  सई च्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या संदर्भात वन विभागाच्या कमलापूर वन् परीक्षेत्र अधिकारी घुगे यांच्याशीलोकस्पर्श च्या प्रतिनिधीने भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असताना त्यांच्या कडून अधिकचा तपशील मिळाला नाही .

elephantcubdiegadchiroliforestKamlapurHattiCampleadstory