सांगलीतील चोरी नांदेड मध्ये पकडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 19 नोव्हेंबर :-  सांगलीत चोरी केलेले 185 ग्राम सोन्याचे दागीने नांदेड पोलीसांकडुन जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आले आहे . स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी ही कारवाई केली आहे. या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नदिड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेळोवेळी पथके तयार करुन या मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.

दि. 18/11/2022 रोजी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका दुकानातून 185 ग्राम सोन्याचे दागीने चोरी केलेले आरोपीचे शोधात सांगली शहर पोलीस हे नांदेड येथे आले होते. त्यांनी त्याचेकडील गुन्हयातील आरोपी शोधकामी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथे मदत मागितल्याने स्थागुशाचे एक पथक त्यांचे मदतीकामी देवुन आरोपीचा शोध घेत असताना सदर चोरी केलेला आरोपी हा पश्चिम बंगाल मधील असुन तो सध्या सराफा लाईन इतवारा नांदेड येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली.

सदरची माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार तसेच सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सापळा रचुन सराफा लाईन, इतवारा नांदेड येथुन इसम उस्मान अली मंडल वय 23 वर्ष रा. भास्करा जि. हुबळी राज्य पश्चिम बंगाल यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे गुन्हयातील चोरी केलेले 185 ग्राम सोन्याचे दागीने एकुण 3,50,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यास पुढील तपासकामी पोलीस ठाणे सांगली शहर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/सचिन सोनवणे, पोहेकॉ/ गुंडेराव करले, गंगाधर कदम, अफजल पठाण, संजय जिंकलवाड, महेश बडगु यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

हे देखील वाचा :-

 

Nandednanded policeRobberysanglitheifs