चंद्रपूर ब्रेकिंग : वीज पडून दोन मेंढपाळाचा दुदैवी मृत्यू

ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ब्रह्मपुरी :  तालुक्यापासून 12 किमी अंतरावर असलेल्या बोरगाव बुद्रुक येथे आज गुरुवार सायंकाळी पाच च्या सुमारास शेळ्या राखणाऱ्या दोन मेंढपाळांचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आशा कमलेश्वर मेश्राम (16) आणि सुरेश नारायण रामटेके (52) ही मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

रोजच्याप्रमाणे दोघेही मेंढपाळ शेळ्या चारायला घेऊन गेले असता आज सायंकाळी 5 वाजताच्या  सुमारास तोरगाव बु. परीसरात अचानक ढगाळ वातावणासह विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात झाला. त्यावेळी दोघेही स्थानिक पोलीस पाटील यांच्या शेतात असलेल्या झाडाचा आसरा घेतला आणि त्याच ठिकाणी मेंढपाळावर वीज पडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुदैवी घटनेमुळे मेंढपाळाच्या परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृत मेंढपाळाच्या परीवाराला शासनाने दखल घेऊन आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी ब्रह्मपुरी पोस्टे चे पथक दाखल होऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत

बिबट्या शेतात घुसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

भरधाव स्कारपीओ वाहनाने ४ वर्षीय चीमुकल्यास चिरडले

 

bramhapuri villageslead story