टप्प्या-टप्प्याने राज्यातील प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • कोरोना लसीकरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ
  • कोरोनावरील लस एकदम सुरक्षित, प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. १६ जानेवारी: गेल्या वर्षभरापासुन सर्वांना ज्याची प्रतीक्षा होती त्या कोव्हीड-19 लसीची प्रतिक्षा संपुन आज 16 जानेवारी रोजी संपुर्ण देशभरामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे संवाद साधत लसीकरणाचा औपचारिक पद्धतीने शुभारंभ केला तर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. पद्मजा अजय सराफ, डॉ. संजय जगताप, रुग्णवाहिका चालक अमोल सुधाकर काळे यांना कोव्हीड-19 लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आलेली असुन नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.

 लसीच्या पहिल्या मानकरी डॉ. सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

 गेल्या मार्च महिन्यापासुन आम्ही कोव्हीड19 महामहामारीचा मुकाबला करत सातत्याने रुग्णांवर उपचार करत आहोत. या काळामध्ये अनेक दु:खद घटनाही अत्यंत जवळुन पाहिल्याआहेत.  कोरोनावरील लस घेण्याचा जिल्ह्यातुन सर्वप्रथम मान मला मिळाल्याबद्दल मनस्वी आनंद होत असुन ही लस एकदम सुरक्षित आहे.  या लसीमुळे कोरोनापासुन सुरक्षितता मिळणार असल्याने प्रत्येकाने ही लस टोचुन घेण्याचे आवाहनही डॉ. सराफ यांनी यावेळी नागरिकांना केले.

प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी : डॉ. संजय जगताप यांचे आवाहन   

कोरोना काळात कोरोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांचे हा मी माझ्या डोळयाने पाहिले आहेत.  कोरोनावरील लस ही अत्यंत सुरक्षित असल्यामुळे प्रत्येकाने ही लस टोचुन घ्यावी, असे आवाहन डॉ. संजय जगताप यांनी यावेळी केले.

यावेळी माजी आ. अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकार रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची उपस्थिती होती.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोव्हीड 19 मध्ये सातत्याने अतिदक्षता विभागामध्ये चोवीस तास कार्यरत राहुन रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे करण्याबरोबरच रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉ. पद्मजा अजय सराफ, डॉ. संजय जगताप यांच्यासह अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक यांना देण्यात आली.

Dr. JagtapDr. SarafRajesh Tope