मुक्तिपथ-शक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबविले

शक्तीपथच्या महिलांकडून ग्राम स्वच्छता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : मुक्तिपथ-शक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ग्राम स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. हा उपक्रम गडचिरोलीसह एटापल्ली, कुरखेडा, चामोर्शी, धानोरा आदी तालुक्यातील विविध गावांमध्ये राबविण्यात आला.
 गाव दारू बंदी प्रमाणे आपले गाव सुंदर व स्वच्छ सुद्धा झाले पाहिजे, या हेतूने श्रमदानातून विविध गावात उपक्रम घेण्यात आले.  गोगाव येथे मुक्तीपथ शक्तीपथ कार्यक्रमाची व दारूबंदीची पाठपुरावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी जयंती निमित्त श्रमदानाच्या माध्यमातून संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. या उपक्रमात गावचे पोलीस पाटील मुनघाटे, उपसरपंच दाखोटे, गावचे ग्रामसेवक एस. पी. संतोषवार यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. सदर कार्यक्रम तालुका प्रेरक मेघा गोवर्धन यांनी घेतला. धानोरा तालुक्यातील तळेगाव चक येथील महिलांनी स्वच्छता उपक्रम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. यासह विविध तालुक्यातील गावांमध्ये शक्तीपथ महिला संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
Comments (0)
Add Comment