तळागाळातील जनतेला बातमीच्या माध्यमातून न्याय देण्याचे लोकस्पर्श न्यूजचे कार्य निश्चितच कौतुकास्पद – खा. अशोक नेते

खा. अशोक नेते यांची लोकस्पर्श न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट.   

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. २८ एप्रिल: गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खा. अशोक नेते हे आज अहेरी येथे कोविड-१९ स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असतांना आलापल्ली येथील लोकस्पर्श न्यूज च्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन लोकस्पर्श न्यूजच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डिजिटल माध्यम क्षेत्रात नव्यानेच पदार्पण केलेल्या लोकस्पर्श न्यूजच्या कार्यालयाला आज संध्याकाळच्या सुमारास खा. अशोक नेते यांनी भेट दिली असतांना त्यांचा समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, स्वीय सहाय्यक राजेंद्र भुरसे, सोनुले, प्राध्यापक निरज खोब्रागडे यांची उपस्थिती होती. यावेळी खा. अशोक नेते यांचे स्वागत लोकस्पर्श न्यूज चे मुख्य संपादक ओमप्रकाश चुनारकर व कार्यकारी संपादक मिलिंद खोंड यांनी केले. तर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे यांचे स्वागत लोकस्पर्श न्यूज कार्यालयातील संगणक परिचालक सचिन कांबळे, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार यांनी केले.  

याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी लोकस्पर्शच्या टीम सोबत संवाद साधतांना त्यांच्या कार्याची प्रशंसा करतांना म्हणाले की, आलापल्ली सारख्या दुर्गम भागात इंटरनेटची समस्या व इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसतांना लोकस्पर्शच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या समस्या बातम्याच्या माध्यमातून उचलून त्यांना न्याय देण्याचे विधायक कार्य होत आहे.सोबतच महाराष्ट्रात घडणाऱ्या विविध क्षेत्रातील घडामोडी वाचकापर्यंत सर्वप्रथम पोहचविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे लोकस्पर्शन्यूज टीमचे कार्य कौतुकास्पद आहे.  

खा. अशोक नेते यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती व त्यांच्याद्वारे या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला देण्यात आलेल्या निर्देश व वरिष्ट पातळीवर पाठपुरावा करून आरोग्य साधन सामुग्रीची उपलब्धता करून देण्याबाबत माहिती दिली. सोबतच जिल्ह्यातील विकासात्मक सुरजागड प्रकल्प, रस्ते, रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर आपण सतत पाठपुरावा करत आहोत आणि सदैव गडचिरोली-चिमूर क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार अशी ग्वाही दिली.  

ashok nete