..अखेर ‘त्या’ वनमजूरांना मिळाला न्याय; संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाना यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : कमलापूर वनपिरक्षेत्रातील रोपवाटीकेमध्ये काम करणा-या मजूरांना ३ वर्षापासून मजूरी न मिळाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली होती. यासंदर्भात जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्य वनंसरक्षक यांना निवेदनातून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यामुळे जागे झालेल्या वनविभाग प्रशासनाने आज, ३ जुलै संबंधित मजूरांची थकित मजूरी सुपूर्द केली. ताटीकोंडावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मजूरांना थकित रक्कमेसह अखेर न्याय मिळाल्याने मजूरांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

कमलापूर वनरिक्षेत्र येथील रोपवाटीकेमध्ये काम करणा-या २७ कुटूंबातील व्यक्तींची माहे जानेवारी २०१९ पासूनची मजूरी वनविभागाद्वारे मिळाली नव्हती. तब्बल ३ वर्षापासून मजूरी थकित असल्याने मजूरांवर उपासमारीची वेळ आली होती. याची माहिती संतोष ताटीकोंडावार यांना मिळताच मजूरांना न्याय देण्यासाठी त्यांनी गडचिरोली मुख्य वनसंरक्षकांना निवेदन सादर करुन मजूरांची थकित मजूरी तत्काळ द्या, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

तसेच यापूर्वी २०१९-२० ला ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात मजूरांसह तत्कालीन सरंपचा रजनिता मडावी यांनी रोपवाटिकेला ताला ठोकला होता. यावेळी संबंधित विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी येऊन मजूरांची मजूरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर मजूरांचे पैसे न मिळाल्याने ताटीकोंडावार यांनी यासंदर्भात रेपनपल्ली पोलिस ठाण्यात संबंधित विभागाविरोधात तक्रार दाखल केली होती.

ताटीकोंडावार यांच्या या सातत्यपूर्ण लढ्याने वनविभाग प्रशासनाला मोठी चपराक बसली. अखेर आज, शनिवारी वनविभागाच्या वतीने संबंधित २७ कुटूंबातील मजूरांना त्यांची तीन वर्षातील थकीत रक्कम प्रदान करण्यात आली. ताटीकोंडावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित मजूरांना न्याय मिळाला मजूरांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे.

हे देखील वाचा  :

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!

कन्या वन समृद्धी योजना आणि रानमळा योजनाची रोपे वाटप

 

 

lead storySantosh Tatikondwar