राज्यात आरोग्य विभागात होणार 10 हजार 27 जागांची मेघा भरती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  21 ऑक्टोबर :- राज्य सरकार ने आरोग्य विभागात तब्बल 10 हजार 27 जागांची मेघा भरती करण्याची मोठी घोषणा केली आहे. या भरतीबाबतची माहित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन ने केली आहे. आरोग्य विभागातील भरतीच्या घोषणेमुळे राज्यातील अनेक तरूणांना रोजगार मिळणार आहे. या भरतीची जाहीरात 1-7 जानेवारी 2023 दरम्यान प्रसिध्द करण्यात येणार आहे तर 26-27 मार्च 2023 ला परीक्षा होणार आहे.

कोरोना काळात आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचार्यांना आपला चांगलाच कस लावावा लागला. मात्र, देशाला कोरोनामुक्त करण्याचा चंगच या आरोग्य कर्मचार्यांनी बांधला होता. या काळात आरोग्य कर्मचार्यांनी जीवावर उदार होउन रूग्णांची सेवा केली. आपल्या कुटूंबियांची पर्वा न करता अनेक महिने दूर राहुन त्यांनी रूग्णांची सेवा केली.

दरम्यान याच काळात आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण आला होता. मात्र, आता या आरोग्य कर्मचार्यांवर अधिकचा ताण येउ नये म्हणून सरकार ने या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर असलेला अधिकचा भार कमी होईत तसेच युवांना रोजगार ही मिळेल.

हे पण वाचा :-

संजय राऊत मीडियाशी बोलले तर आपल्याला नेमकी काय अडचण आहे?

कारमध्ये फुग्यांचा स्फोट : चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी

departmenthealthrecruitment