विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना , दि. २४ जानेवारी; आपल्यातील काही समाज थोडे पुढे गेले असतील पण भटका समाज अजूनही खूप मागे आहे,12 बलुतेदारांची अवस्था वाईट आहे,मी विश्वासाने सांगतो बारा बलुतेदारांचे स्वतंत्र महामंडळ निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याबाबत ची कारवाई सुरू केली असल्याचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले ते आज जालना येथे ओबीसी मोर्चा साठी आले असतांना बोलत होते.
जागते रहो..एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत ओबीसी समाजात घुसू पाहणाऱ्यांना हा इशारा आहे गायकवाड समिती ही मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाची ही समिती होती मात्र या समितीवर मागासवर्गीयच नव्हते हाच खरा मुद्दा आहे तरी देखील एसीबीसी तून मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी कुणाचाही विरोध नाही परंतु काही विघ्नसंतोषी त्याला वेगळे वळण देण्यासाठी काम करत आहेत असे म्हणाले मंत्री विजय वडेट्टीवार जालन्यात रविवारी सकाळी ओबीसी मोर्चात सहभागी होण्यासाठी ते आले असताना बोलत होते. औरंगाबाद येथील शाम सराटे यांनी केलेल्या सर्वेक्षण नंतर ते असे म्हणत आहेत की मराठा समाज हा ओबीसी आहे असे वडेट्टीवार यांनी सांगितले. हा मोर्चा राजकीय पक्षाच्या पलीकडे आहे ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण मोर्चात सहभागी होत आहोत आणि मंत्री म्हणून व्यथा ऐकणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.केन्द्र सरकारने ओबीसी समाजाची स्वतंंत्र जनगणना करावी असे ते म्हणाले.
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडे अकरा वाजता भव्य मोर्चाला सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ओबीसी समाजातील नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला होता. ढोलताशा पथके आणि विविध वाद्य परंपरागत नृत्य आणि गीते सादर करण्यात आली, विशेषत्वाने बंजारा महीला व पुरूषांच्या नृत्य प्रकाराने परिसरात वेगळे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूर, सांगली व सातारा या सगळ्या भागातील ओबीसी समाजातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला होता.
खूप छान बातमी बारा बलुतेदार महामंडळ स्थापन झालेच पाहिजे ज्यामुळे बलुतेदार यांचे “कल्याण” होणार आहे.