चक्क..! चोरट्यांनी हनुमान मंदिराच्या दानपेटीवरच मारला डल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा, ४ जानेवारी: येथील गांधी वार्डात असलेल्या सार्वजनिक हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील रक्कम लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यानी रात्रीच्या सुमारास फोडून दानपेटीतील रक्कम लंपास केली घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस स्टेशनचे  ठाणेदार सुधाकर देडे यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासाकरिता श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शीतल माने करीत आहेत.

हनुमान मंदिर कुरखेडा