लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपुर, 24, सप्टेंबर :- सततच्या पेट्रोल , डिझेल।आणि गॅसच्या दरवाढीमुळे जनसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याचा उद्रेक काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या ठिय्या आंदोलनाने बाहेर पडला. आणि या उद्रेकाला केंद्रीय हरदीप सिंग पुरी यांना सामोरे जावे लागले.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी हे चंद्रपूर च्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारने सतत पेट्रोल, डिझेल, गॅस यात दरवाढ केल्यामुळे महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे असा आरोप करत चंद्रपूर महिला काँग्रेस ग्रामीण कडून हरदीप सिंग पुरी यांचा त्यांच्या मार्गावर ठिय्या निषेध करण्यात आला.
लोकसभेची जबाबदारी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून भेटी गाठी घेणार आहेत. याचाच निषेध करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीणच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात महिला काँग्रेस तर्फे निदर्शने करण्यात आले.
पुरी हे पेट्रोलियम मंत्री आहेत पण पेट्रोल, डिझेल चे दर कमी राहावे म्हणून त्यांनी काहीही प्रयत्न केले नाही. उलट भाजपला फक्त निवडणूक दिसते. गोरगरीब जनता दिसत नाही, भाजपा हे एक इलेक्शन मशीन आहे. आता सुद्धा लोकसभा निवडणुक डोळ्या समोर ठेऊन पुरी चंद्रपूरात आले आहेत, यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधता येतो पण सामान्य लोकांशी नाही. असा आरोप यावेळी नम्रता ठेमस्कर यांनी केला. यावेळी उपस्थित महिलांनी महागाई विरोधात घोषणा दिल्या. तसेच फलक हातात घेऊन पुरी यांचा निषेध केला.
हे देखील वाचा :-
लम्पि चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर कत्तल खाने बंद ठेवण्याचे आदेश.