लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 04 जून : जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याबाबत कोणतेही निर्देश शासनामार्फत सद्या प्राप्त झालेले नाहीत.
सामाजिक माध्यमांतून फिरत असलेला संदेश चुकीचा असून, कोणत्याही व्यक्तींनी यांस बळी पडु नये अथवा नागरिकांनी सदर बाबतीत कोणत्याही कार्यालयात चौकशी करु नये असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मु.का.अ. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
धक्कादायक!! पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर अत्याचार!