पापडखिंड धरणात तीन मुले बुडाले

विरारच्या एकाचा मृत्यू दोघांना वाचण्यात यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

विरार, 17 जुलै – विरारच्या फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांपैकी ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रविवारी सुट्टी निमित्ताने विरार फुलपाडा परिसरात राहणारे बोराडे कुटुंबीय व त्यांच्या शेजारील अन्य दोन मुले पापडखिंड धरणावर फिरायला गेले होते.

संध्याकाळी साडे पाच च्या सुमारास पाण्यात उतरले असताना ओम बोराडे (११) आणि त्याचे दोन मित्र अंश (१२) आणि वंश( ११) पाण्यात बुडू लागले. स्थानिकांच्या मदतीने वंश आणि अंश यांना वाचविण्यात यश आले. मात्र ओम पाण्यात बुडून मरण पावला. याप्रकरणी रात्री ११ वाजता विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पापडखिंड धरणातून विरार शहराला दररोज १ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. या धरण परिसरात फिरण्यासाठी तसेच पाण्यात पोहण्यासाठी बंदी आहे. तरी येथील पर्यटक जीव धोक्यात घालून पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना दिसून येत आहेत.

मागील आठवड्यात याच धरणात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता मात्र या महिन्यात वसई विरार शहरात 10 जणांचा बुडून मृत्यु झाले असल्याने सुरक्षा व्यवस्थे वर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असिलचे दिसून येत आहे.

हे पण वाचा :-

familypicnicmansoonsming