मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात एक वर्षाच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, ४ गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

डहाणू 09, जानेवारी :-  मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटीजवळील श्री महालक्ष्मी मंदिराजवळील पुलावर आज दुपारी एक वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातात एकाच कुटुंबातील तीन प्रवासी ठार तर चार जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका एक वर्षीय बालिकेचा ही समावेश आहे. विशेष म्हणजे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली असल्याने राष्ट्रीय महामार्गाची सुरक्षितते बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील राठोड कुटुंबीय दुपारी गुजरातच्या दिशेने भिलाड येथे जात असताना डहाणू श्री महालक्ष्मी मंदिरासमोर कार चालक दीपक राठोड याने कंटेनर ट्रकच्या मागील बाजूस धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात नरोत्तम छना राठोड (65), केतन नरोत्तम राठोड (32), आर्वी दिपेश राठोड (01) यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपेश नरोत्तम राठोड (35), तेजल दिपेश राठोड (32), मधु नरोत्तम राठोड (58), स्नेहल तर दीपेश राठोड (४.५) हा गंभीर जखमी झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जवळच्या कसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.विशेष म्हणजे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली असल्याने राष्ट्रीय महामार्गाची सुरक्षितते बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आय आर बी आणि महामार्ग प्रशासनाने मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांकडे आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा :-

ठाकुरदेव यात्रेच्या समारोपप्रसंगी सुरजागड लोह खदानी विरोधात एल्गार!

अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा