वाघोली येथील तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करून अंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या वाघोली गावांतील तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करून अंत झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

या घटनेत मृत झालेल्या सोनी मूकरू शेंडे (१३) ही मुलगी विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथे आठव्या वर्गात शिकत होती. समृद्धी ढिवरु शेंडे (११) ही मुलगी गावांतीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चवथ्या वर्गात शिकत होती. पल्लवी रमेश भोयर (१५) ही मुलगी गडचिरोली तालुक्यातील येवली येथील असून ती आपल्या मामाकडे वाघोली ला आली होती. ही यावर्षी इयत्ता 10 विला होती.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने पल्लवी रमेश भोयर हि आपल्या मामाच्या (वाघोली) गावी आली होती. सदर गावातील सोनी मुकरू शेंडे, समृद्धी ढिवरु शेंडे  आणि पल्लवी रमेश भोयर या तिन्ही मुली मिळून दुपारच्या सुमारास डोंग्यात बसून दुसऱ्या काठावर जाऊन आंबे तोडण्यासाठी निघाल्या होत्या. त्यानंतर डोंगा खोल पाण्याजवळ आला तेव्हा डोंग्याचा तोल गेल्याने या तीनही मुली डोंग्याच्या खाली पडल्या आणि त्याठिकाणी खूप खोल पाणी असल्याने या तिघींना पोहता आले नसल्याने त्या पाण्यात बुडाल्या आणी त्यांचा करुण अंत झाला.

डोंगा चालवणारा नावाडी हा कसाबसा पोहून दुसऱ्या काठावर पोहचू शकला. पण या तीनही मुलींना तो वाचवू शकला नाही. विशेष म्हणजे मृत झालेली सोनी आणी समृद्धी या सख्या चुलत बहिणी असून पल्लवी ही या दोन मुलींची मेहुणी लागते. ही घटना गावांमध्ये पसरताच संपूर्ण गावांत शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी येथील पोलिस पथक घटनास्थळी दाखल होऊन तीनही मुलींच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्ट्मसाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

lead storyWagholi