कोठी, नारगुंडा पोलिस मदत केंद्रात नागलवाडीच्या चिमुकल्यानी तयार केलेल्या राखीचे बांधले रेशमी बंध.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

भामरागड, 31ऑगस्ट : युवा चेतना मंच या स्वयंसेवी संस्थेचे पालकत्व लाभलेले जिल्हा परिषद शाळा , नागलवाडी येथील अत्यंत गरीब मुला-मुलींनी सामाजिक दायित्वाचे भान राखत पोलीस जवान यांच्यासाठी राखी तयार केल्या होत्या. या राखी विशेषत्त्वाने त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका भामरागड येथे कार्यरत पोलिसांसाठी तयार केल्या होत्या.

या राखी राखी पौर्णिमेच्या पर्वावर भामरागड येथील अतिदुर्गम भागातील कोठी पोलीस मदत केंद्र व नारगुंडा पोलीस मदत केंद्र च्या पोलिस बांधव यांना बांधण्यात आल्या. नागलवाडी येथील ही मुले पूर्वी कचरा वेचून आपल्या पालकांना आधार देत होते. हसत्या खेळत्या आणि शिक्षण घेण्याच्या या वयात अत्यंत गरीबीमुळे ही मुले वाट्टेल ती कामे करत होती. मात्र, युवा चेतना मंच च्या माध्यमातून ही मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली आहेत. शिवाय, त्यांच्या पालकांसाठीही विशेष उपक्रम राबविण्यात येऊन, त्यांचे जीवनमान उंचावले जात आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी ही मुले भामरागड येथे कार्यरत पोलिसांसाठी राखी बनवत असतात. पोलिसही या मुलांच्या प्रेमामुळे आनंदीत होत असतात.

यावर्षी ही डॉ श्रुती आकरे , प्रतिभा सावरकर , वैष्णवी देशमुख यांनी पोलीस जवानाना राखी बांधली.जन संघर्ष समिती नागपूर च्या वतीने नक्षल बांधव यांच्या साठी मोठी राखी तयार करून जंगलात बांधण्यात आली व तयांना संदेश देण्यात आला.

प्रिय
नक्षल बंधू-भगिनी
आपणास भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा नाजूक बंध प्रतिपादित करणाऱ्या राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊ आणि बहिण, हे नाते जगाच्या पातळीवर सर्वत्र नांदते आहे. त्यामुळे, आपणही हे नाते मानता, असा आमचा विश्वास आहे. विश्वासावरच हे जग टिकले आहे. आपण अल्लुरी सीताराम राजू यांनी दिलेल्या ‘’जल, जंगल, जमीन” या घोषणेचे तन्मयतेने पालन करता. आदिवासींच्या अस्तित्वासाठी आपण हातात शस्त्र घेतले आणि आदिवासींनाही शस्त्र धरण्यास भाग पाडले. सोबत शास्त्रही (ज्ञानाचे पुस्तक) दिले असते तर किती बरे झाले असते. आता आपण नक्षल वाट सोडून साम्राज्यवादी माओवाद धरला आणि आपल्या सशस्त्र उठावाचा सत्यानाश केला.
आज आमची ही राखी आपल्यासारख्या भरकटलेल्या भावांना, भगिनींना परत अस्तित्वाच्या वाटेवर आमंत्रित करण्यासाठी आहे. आपण सारासार विचार कराल, आमचे आत्मीय प्रेम स्विकाराल, ही अपेक्षा.

जय दण्डकारण्य
मावा देश, माडिया देश

असा संदेश देण्यात आला राखी च्या कार्यक्रमसाठी दत्ता शिर्के , अभिषेक सावरकर , संदीप आकरे , महेश राऊत , साइशा आकरे , कोठी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस निरीक्षक माने साहेब व नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बेले साहेब व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-